जळगाव (प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समितीची संरक्षक भिंत पाडल्याने आज बाजार असो. ने पुकारलेल्या बेमुदत बंद बाबत बाजार समिती सभापती कैलास चौधरी यांना विचारले असता ते म्हणाले की, या संकुलामुळे समोरील काही दुकान दिसणार नसल्याने त्यांचा हा विरोध होत असून यात मार्केट कमिटीचे अहित असल्याचे मत मांडले.
२०१४ पासून संकुल मंजूर असून मक्तेदाराला कार्यादेशही देण्यात आला आहे. तेथे कॉम्प्लेक्स बांधण्याची जबाबदारी मक्तेदाराची आहे. बऱ्याच वर्षांपासून प्रकरण रेंगाळल्याने मार्केट कमिटीला गाळे भाडे तत्वांवर देवून मिळणार असलेल्या उत्पन्नाचे बरेच मोठे नुकसान होत आहे. हे काम २०१५-१६ लाच पूर्ण होणे अपेक्षित असताना व्यापाऱ्यांनी बंद पुकारून यात खोडा घातला आहे. व्यापाऱ्यांचे यात वैयक्तिक कोणतेच नुकसान होत नसून त्यांना प्लॅननुसार जागा देण्यात आली आहे. या संकुलामुळे समोरील काही दुकान दिसणार नसल्याने त्यांचा हा विरोध होत असून यात मार्केट कमिटीचे अहित होत आहे. स्वरंक्षक भित पडल्यानंतर तेथे सुरक्षारक्षक नसल्याने व्यापऱ्यांचा तसेच शेतकऱ्यांचा माल उघडल्यावर पडला असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. याबाबत विचारले असता सभापती म्हणाले, मार्केटमधील प्रत्येक व्यापाऱ्याला गोडाऊन देण्यात आले असून तेथे त्यांनी आपला मला तेथे ठेवावा. तसेच रात्री बाजार समितीचे कर्मचारी व खाजगी सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आले आहेत. अशी माहितीही त्यांनी दिली. मार्केटमध्ये चोरी होणार नाही, याची आम्ही खबरदारी घेत आहोत. हे कॉम्प्लेक्स जर पूर्ण झाले तर चार महिन्यात २०० शेतकरी, संबधित व्यापारी व गाळेधारकांची सोय होणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.