मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उध्दव ठाकरे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
काल रात्री उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासह विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. या अनुषंगाने त्यांनी रात्रीच राज्यपालांकडे दोन्ही पदांचा राजीनामा सोपविली. यानंतर आज सकाळी अकरा वाजता भाजपची मुंबईत तर एकनाथ शिंदे गटाची गोव्यात बैठक होत आहे. या बैठकीत सत्ता स्थापन करण्याचे नियोजन केले जाईल. यानंतर एकनाथ शिंदे हे मुंबईत येऊन फडणवीस यांच्या सोबतीने राज्यपालांची भेट घेतली. या भेटीत सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल.
दरम्यान, मंत्रीमंडळाचा शपथविधी नेमका केव्हा होणार हे स्पष्ट झालेले नाही. तथापि, फडणवीस आणि शिंदे हे उद्याच शपथ घेणार असून एकाच वेळेस सर्व मंत्री शपथ घेणार की नाही त ? याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र दोन दिवसात नवीन सरकार अस्तित्वात येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.