मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांनी घोटाळे केले असून त्यांची संपत्ती जप्त करून जनतेत वाटणार असल्याचा इशारा आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा राज्य सरकारला टार्गेट केले. ते म्हणाले की, मला समन्स बजावण्यात आलं आहे. हजर व्हा अन्यथा कायदेशीवर कारवाई होईल. ठाकरे महाशय ते तुमचे प्रवक्ता संजय राऊत बाप, बेटे जेलमध्ये जातील असं सांगत आहे. आम्ही हजार वेळा जेलमध्ये जाऊ. यासाठी आम्हाला जेलमध्ये पाठवणार आहात का?, अशी विचारणा किरीट सोमय्यांनी केली आहे.
भुजबळांची १०० कोटींची संपत्तीविषयी मी हायकोर्टात याचिका केली होती त्यामुळे भुजबळ दोन वर्ष जेलमध्ये जाऊन आले. ४ सप्टेंबरला ती संपत्ती बेनामी घोषित करुन जप्त करण्यात आली. त्याच्या पाहणीसाठी गेलो होतो आणि त्यासाठी उद्धव ठाकरे मला जेलमध्ये पाठवत आहेत. पण मी अशा धमक्यांना घाबरत नाही. महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांनी जी संपत्ती जमा केली आहे ती जप्त करुन जनतेला देणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी याप्रसंगी दिला. दरम्यान, आज सोमय्या सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हजेरी लावणार आहेत. पोलिसांनी किरीट सोमय्यांना समन्स बजावलं होतं.