Home धर्म-समाज पाचोरा शहरात वीर एकलव्य जयंतीनिमित्त मिरवणूक (व्हिडीओ)

पाचोरा शहरात वीर एकलव्य जयंतीनिमित्त मिरवणूक (व्हिडीओ)


Pachora mirwanuk

पाचोरा (प्रतिनिधी) । शहरातून शोभायात्रा काढून वीर एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपारीक लोकनृत्य, महापुरुषांच्या भव्य प्रतिमा, एकलव्याची मोठी प्रतिमा ट्रेकटर ठेवून अशी ही मिरवणूक काढण्यात आली होती. जयंती उत्सवाची सुरुवात सकाळपासून झाली. प्रत्येक ग्रामीण भागात सह पाचोरा शहरात परधांडे रोडवरील भिलवाडा वस्तीमध्ये सकाळी ११ वाजेच्या दरम्यान वीर एकलव्यांच्या मूर्तीचे पूजन झाले. या परिसरात प्रत्येक भिल्ल समाजाच्या घरावर लाल झेंडी मोटरसायकल लावून जय घोषणा करण्यात त्या सोमवारी दुपारी २ वा एकलव्य संघटनेचे जिल्हाअध्यक्ष सुधाकर वाघ यांच्याहस्ते पूजन करून मिरवणूक काढण्यात आले

यावेळी टायगर फोर्सचे जिल्हाध्यक्ष गणेश वाघ, तालुकाध्यक्ष समाधान सोनवणे, महिला आघाडीच्या योजनताई सोनवणे, शांताराम मोरे, डॉ.उत्तम चौधरी, मोतीलाल चौधरी, भाजपचे शहरपाध्यक्ष वीरेंद्र चौधरी, उत्तम मोरे, संदीप गायकवाड आदी उपस्थित होते. सुमारास शोभायात्रेला प्रारंभ झाला. या शोभायात्रेत पारंपारीक लोकनृत्य गीत सादर करण्यात आले. लाल रंगाचे झेंडे लावू अनेक महिला आदिवासी वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. उत्सवाच्या यशस्वी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

पहा : पाचोरा शहरातून काढलेली मिरवणूक


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound