Home Cities जळगाव जिल्ह्यातील ज्वारी, मका व बाजरी खरेदी प्रक्रियेला सुरुवात 

जिल्ह्यातील ज्वारी, मका व बाजरी खरेदी प्रक्रियेला सुरुवात 

0
228

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । खरीप पणन हंगाम २०२५-२६ अंतर्गत ज्वारी, मका आणि बाजरी या भरडधान्य पिकांच्या किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेला जिल्ह्यात प्रारंभ होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी शासनाने ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २७ ऑक्टोबर २०२५ ते ३१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाईन नोंदणी सुरू असून, प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया ३ नोव्हेंबर २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत चालणार आहे.

या योजनेअंतर्गत शासनाने ज्वारी (संकरीत)साठी प्रति क्विंटल ३६९९ रुपये, मका साठी २४०० रुपये आणि बाजरीसाठी २७७५ रुपये असा किमान आधारभूत दर निश्चित केला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पणन महासंघाने विविध तालुक्यांमध्ये उपअभिकर्ता संस्थांची नियुक्ती केली आहे.

अमळनेर केंद्रासाठी एरंडोल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लि., पारोळा केंद्रासाठी शेतकरी सहकारी संघ लि. पारोळा, चोपडा केंद्रासाठी चोपडा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लि., धरणगावसाठी कै. अण्णासो पवार सहकारी संस्था चांदसर, पाळधीसाठी कै. अण्णासो साहेबराव पाटील फ्रुटसेल सहकारी संस्था, एरंडोलसाठी एरंडोल तालुका शेतकरी संघ, म्हसावदसाठी जळगाव तालुका शेतकरी संघ, जळगाव केंद्रासाठी जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा संस्था, भुसावळसाठी भुसावळ तालुका शेतकरी संघ, यावलसाठी कोरपावली विकास सेवा सोसायटी, रावेरसाठी रावेर तालुका शेतकरी संघ, मुक्ताईनगरसाठी मुक्ताईनगर तालुका शेतकरी संघ, बोदवडसाठी बोदवड को-ऑप परचेस अँड सेल युनियन, जामनेरसाठी शेतकरी संघ, शेंदुर्णीसाठी शेंदुर्णी सहकारी खरेदी विक्री ॲन्ड निनींग प्रेसिंग संस्था, पाचोरासाठी शेतकरी संघ, भडगावसाठी शेतकरी संघ आणि चाळीसगावसाठी शेतकरी संघ यांची निवड करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी प्रक्रिया POS मशीनद्वारे ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँक पासबुक, चालू वर्षाचा ७/१२ उतारा आणि पिकपेरा दाखला यासह उपस्थित राहावे. खरेदीसाठी SMS प्राप्त झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी आपला FAQ दर्जाचा माल केंद्रावर आणावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी, उपनिबंधक, जिल्हा कृषी अधीक्षक आणि जिल्हा पणन अधिकारी यांनी आवाहन केले असून, कोणतीही तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी जिल्हा पणन अधिकारी एस. एस. मेने यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound