जळगावात वैद्यकीय तपासणीसाठी नेलेल्या कैद्याचे पलायन (व्हिडीओ)

mibarak tadvi

जळगाव, प्रतिनिधी | येथील सबजेल मधील एका कैद्यास आज दुपारी वैद्यकीय तपासणीसाठी येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असता तो पोलिसाच्या हाताला झटका देवून पळून गेल्याची घटना घडली.

 

अधिक माहिती अशी की, मुबारक नबाब तडवी (रा वड्री पळसाळे, ता.यावल) असे कैद्याचे नाव असून त्याची जिल्हा रुग्णालयातून तपासणी करून त्याला परत आणत असताना शेख मुसा शेख नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला झटका देवून त्याने पलायन केले. याबाबत संबंधित पोलिसाने दिलेल्या तक्रारीनुसार भादवि कलम ३२४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी दिली आहे.

 

Protected Content