Home Cities जळगाव जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले !

जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले !

0
242


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण गटासाठी निघाल्याने मोठी चुरस वाढणार आहे.

आज मुंबईत राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण काढण्यात आले. यातील सात जिल्हा परिषदांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण निघाले आहे. यात जळगाव जिल्हा परिषदेचाही समावेश आहे. यामुळे यंदाच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे.

जळगाव जिल्हा परिषदेसाठी आधी 67 गट होते, यात एकाची भर पडली असून एकूण 68 गट असणार आहेत. यातून सर्वसाधारण गटासाठी आरक्षण निघाल्याने अध्यक्षपदासाठी अभूतपुर्व चुरस निर्माण होणार आहे. अनेक मातब्बर नेते अध्यक्षपदासाठी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत आता मिळाले आहेत.


Protected Content

Play sound