मुंबई (वृत्तसंस्था) क्रांती दिनी म्हणजेच 9 ऑगस्टला इव्हीएम विरोधात सर्व विरोधीपक्ष आणि संघटनां मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. याआधी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेकवेळा ईव्हीएम विरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे ईव्हीएमविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चात हे तिघं नेते एकाच मंचावर येणार,अशी शक्यता वर्तविली जात आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने तर निवडणूक बॅलेट पेपरद्वारे निवडणूक न झाल्यास निवडणुकीवर बहिष्काराची भाषा केली आहे. अजित पवार यांनी देखील इव्हीएमच्या मुद्यावर शंका उपस्थित केली आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांनी देखील इव्हीएमच्या मुद्यावर केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. तसेच बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याची मागणी केली होती. तसेच इव्हीएम विरोधात देशव्यापी आंदोलन उभे राहण्याची गरज असल्याची भूमिका राज ठाकरे यांनी मांडली होती.