यावल-लाईव्ह ट्रेंड न्युज प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीसाठीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. यावेळी रावेर लोकसभा मतदार संघातील यावल येथे निवडणुक आयोगाच्यावतीने तहसीलदार मोहनमाला नाझीरकर व एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार संकल्पनेतुन व त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणारे अधिकारी यांच्या व संयुक्त विद्यमाने सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या रावेर, यावल व चोपडा या क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या बहुसंख्य आदिवासी मतदार असून आदिवासी समाज बांधवांमध्ये मतदान विषयी जनजागृती व्हावी या दृष्टीकोणातुन साकारण्यात आलेले आहे.
आदिवासी समाज बांधवांच्या पारंपारिक सांस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या अशा आगळ यावेगळया आदर्श आदिवासी मतदान केन्द्राची उभारणी शहरातील माध्यमिक कन्या शाळेत करण्यात आली आहे. हे मतदान केंद्र अतिशय सुंदर व सर्वांसाठी आर्कषणाचे केन्द्र बनले आहे. मतदारांकडून सकाळपासुन उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी पहावयास मिळाली आहे. यावल शहरातील मतदारांची टक्केवारी लक्ष वेधणारी असेल असे चित्र मतदान केन्द्रा दिसुन येत आहे. यावल तालुक्यातील मतदारांमध्ये उत्साहाचे दिसून येत आहे. मागील पंचवार्षीक मतदानाच्या टक्केवारी पेक्षायावेळीची टक्केवारी पुढे जाईल असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.