धक्कादायक : धर्मपरिवर्तनाचा डाव विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कालिंका माता मंदीर परिसरातील मंगलम लॉन्समधील एका हॉलमध्ये रविवारी २ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास प्राथनेसह सत्संगच्या नावाखाली धर्मपरिवर्तन सुरू असल्याचा प्रकार सुरु होता. या प्रकाराचा विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना पर्दाफाश केला. त्यांनी एमआयडीसी पोलीसांना घटनेची माहिती दिली. पोलीसांनी चौकशीसाठी चार जणांना ताब्यात घेतले असून चौकशीचे काम सुरू आहे.

धर्म परिवर्तन होत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर ते कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी चौकशी केल्यानंतर संपुर्ण माहिती जाणून घेतली. आमच्या देवाची प्रार्थना केल्यास आजार बरे होत असल्याचे सांगत त्यांना प्रार्थनेसह सत्संगाच्या नावाखाली एकत्रित करुन त्यांचे धर्मपरिवर्तन करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. याप्रकरणी दोन पुरूषांसह इतर दोन महिलांना एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. .

Protected Content