विमानाचा अपघात टळला

 

नवी दिल्ली, वृत्तसेवा । मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचा मोठा अपघात टळला आहे. इंडिगो विमानाला एक पक्षी येऊन आदळल्यानंतर तातडीने मुंबई विमानतळावर विमान लॅण्ड करण्यात आले.

रविवारी इंडिगोचे फ्लाइट 6E 5047 मुंबईहून दिल्लीकडे येत होते. यावेळी, अचानक विमानाच्या पुढच्या भागावर एक पक्षी आदळला. त्यामुळे विमान पुन्हा मुंबईत बोलविण्यात आले. सुदैवाने या अपघातात एकही प्रवासी जखमी झाला नाही. जेव्हा विमान मुंबई विमानतळावर आणले गेले, तेव्हा इंडिगोच्या अधिकाऱ्यां सांगितले की त्यांनी तातडीने प्रवाश्यांसाठी दुसर्‍या विमानाची व्यवस्था केली आहे. मात्र पहिले विमान रद्द केल्यामुळे मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी विलंब झाला. मात्र प्रवाशांनी इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी आणि क्रु मेंबर्सने दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक केले आहे.

Protected Content