पाचोरा प्रतिनिधी । शहरातील त्र्यंबक नगरातील गटारींची अत्यंत दयनीय अवस्था झाले असून यासंदर्भात २० सप्टेंबर रोजी पहिले स्मरण पत्र देण्यात आले होते. तरी मात्र, पाचोरा नगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, दुसरे स्मरण पत्र देत येत्या ५ ऑक्टोंबर रोजी प्रशासनाविरोधात आमरण उपोषणाला करणार असल्याचे निवेदन दिले आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक- ३ मधील त्र्यंबक नगरातील गटारींची झालेली अवस्था ही अतिशय खराब आणि दयनीय झालेली आहे. स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला असुन नगरपरिषदेस वारंवार तक्रार देऊन सुद्धा हे काम झाले नाही. गेल्या चार महिन्यांपूर्वी एका गटारीचे काम करण्यात आले होते. पहिल्याच पावसात बांधण्यात आलेली गटार पुर्णपणे जमिनदोस्त झाली आहे. सदरील काम निकृष्ट दर्जाचे झाले असुन यावर मुख्याधिकारी यांनी तात्काळ कारवाई करावी. तसेच त्रंबक नगर मधील रस्ते व गटारी गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून झालेले नाही. या गटारी व रस्त्यांचे काम तात्काळ मार्गी लावावे. नगरपालिकेच्या बांधकाम विभाग व आरोग्य विभाग या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतांना दिसत आहे. येणाऱ्या पंधरा दिवसात एक ऑक्टोंबर पर्यंत गटारीचे काम व रस्त्याचे काम सुरू करावे अन्यथा होणाऱ्या पुढील परिणामाला नगरपालिका व मुख्याधिकारी हे जबाबदार राहतील. अशा आषयाचा तक्रारी अर्ज येथील प्रशांत पाटील सह स्थानिक रहिवाशांनी दि. १५ सप्टेंबर २०२१ रोजी दिले होते. मात्र नगरपालिकेकडून व बांधकाम विभागाकडून कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने प्रशांत पाटील सह रहिवाशांनी दि. २० सप्टेंबर २०२१ रोजी तक्रार अर्जाचे पहिले स्मरण पत्र देण्यात आले होते. तरीसुद्धा नगरपालिका मुख्याधिकारी व बांधकाम विभाग यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अर्जाची दखल घेण्यात आलेली नाही. त्र्यंबक नगर हे पाचोऱ्यातच येते की वेगळ्या ग्रहावर येते ? असा प्रश्न त्र्यंबक नगरवासीयांना पडलेला आहे.
गेली वीस वर्षे झाले त्र्यंबक नगर मधील काही रहिवासी त्यांचा टॅक्स हा वेळेवर भरतात. आज का टॅक्सची रक्कम वीस वर्षांमध्ये एवढी झाली आहे किती स्वखर्चातून बेसिक गरज जसे गटारी बनवणे व रस्ते बनवणे हे तर नक्कीच करु शकले असते पण गेल्या वीस वर्षांमध्ये त्र्यंबक नगर मध्ये ना रस्ता झाला गटारी झाल्या. भुयारी गटारी आहे ते रस्ते सुद्धा खोदून ठेवून भुमिगत गटारीचे लाॅलिपोप देण्यात आले आहे. याबाबत प्रशांत पाटील सह रहिवाशांनी दुसरे स्मरण पत्र देत वरील मागण्यां येणाऱ्या ४ ऑक्टोंबर पर्यंत काम सुरू न झाल्यास प्रशांत पाटील सर्व त्रंबक नगर रहिवासी दि. ५ ऑक्टोंबर पासून नगरपालिकेसमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे प्रशांत पाटील सह स्थानिक रहिवाशांनी प्रशासनास निवेदनाद्वारे कळविले आहे.
व निवेदनाच्या प्रती आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहील, जिल्हाधिकारी जळगांव, उपविभागीय अधिकारी (पाचोरा), तहसिलदार (पाचोरा), पोलिस अधीक्षक, जळगांव यांना पाठविण्यात आल्या आहेत.