चाळीसगाव – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील घाट रोडवरील एका कृषी केंद्राच्या दुकानातून अज्ञाताने एकूण पस्तीस हजारांचा रोकड लंपास केल्याची घटना घडली होती. त्यानंतर याची नोंद होताच शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. आणि सीसीटीव्ही च्या साहाय्याने आरोपीला ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १९ ऑगस्ट रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास चाळीसगांव शहरातील घाटरोड वरील “फकीराव रामराव कंपनी खते व बियाण्या’च्या दुकानात ” कोणी नसल्याचा गैरफायदा घेवुन अज्ञात चोरट्याने दुकानाच्या ड्रावर मधुन ३५ हजार रुपये चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली होती.
त्यानंतर याप्रकरणी फिर्यादी सतीष बाबुराव भालारे रा. चाळीसगाव यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सदर चोरी भर बाजारात गर्दीच्या ठिकाणी झाल्यामुळे व्यापाऱ्यामध्ये असुरक्षितता वाटू लागली.
अशातच शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी एका पथकाची नियुक्ती केली. यामध्ये प्रामुख्याने पोउपनि सुहास आव्हाड, पोहेकॉ योगेश बेलदार, पोना दिपक पाटील, पोकॉ निलेश पाटील, अमोल भोसले, गणेश कुवर, नंदकिशोर महाजन, प्रविण जाधव, शरद पाटील, मोहन सुर्यवंशी, विनोद खेरणार अशांना आरोपी शोधाबाबत सूचना देण्यात आल्या.
यावर सदर पथकाने घटनास्थळी जाऊन दुकानातील सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्याची पाहणी करताना एक संशयीत इसम हा चोरी करतांना दिसुन आला. सदर संशयीत इसमाबाबत गोपनीय माहीती काढण्यात आली असता तो ७ वी गल्ली क्रांतीवीर चौक पारोळा रोड, धुळे येथे राहत असल्याबाबत माहीती मिळाली. आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. आनंदा राजु सरोदे असे या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी २२ ऑगस्ट रोजी त्याला ताब्यात घेतले.
सदर आरोपीतास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली देवुन याव्यतिरिक्त चाळीसगाव शहरातील एका भांडे विक्री करणाऱ्या दुकानातुन एक मोबाईल फोन चोरी केल्याची अजून कबुली दिली असून अजून चोरीबाबत काही कबूली देण्याची शक्यता असल्याचे कळते आहे.
तत्पूर्वी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी एम. राजकुमार पोलीस अधिक्षक यांच्या आदेशान्वये तसेच अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे व सहा. पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनखाली गुन्हे शोध पथकाची स्थापना करण्यात आली आहे. सदर पथक स्थापन झाल्यापासुन चोरीच्या गुन्ह्यांना बऱ्यापैकी आळा बसला असुन गुन्हे उघकीस आणण्याचे प्रमाण वाढले आहे. तरी सदर गुन्हे होऊ नये म्हणुन व्यापाऱ्यानी दुकांनात संशयीतांवर लक्ष ठेवुन दुकांच्या सुरक्षेकामी सीसीटीव्ही कॅमेरा लावून पोलीसांना ” एक कॅमेरा पोलीसांसाठी “या उपक्रमास साथ द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोहेकॉ योगेश बेलदार, पोकॉ निलेश पाटील हे करीत आहेत.
दरम्यान सदर आरोपीतास अटक केल्यामुळे मार्केट परिसरातील सर्व व्यापारी तसेच दुकान मालक प्रदीप देशमुख यांनी समाधान व्यक्त करुन पोलीसांना चांगल्या कामाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.