पत्रकारांच्या व्यथा जाणून घेतल्या पाहिजे- वसंत मुंडे

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पत्रकाराच्या आंत डोकावित, त्याच्या व्यथा सुद्धा समाजाने जाणून घेत, त्याला मदतीचा हात दिला पाहिजे, असे प्रतिपादन राज्य पत्रकार संघाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी लोकशाहीच्या बळकटीसाठी आणि पत्रकारांच्या हक्कासाठी संवाद यात्रा काढली आहे. या यात्रेचे गुरुवारी अमळनेरात आगमन झाले.साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला त्यांनी विनम्र अभिवादन केले आणि चौकात त्यांनी प्रबोधन करतांना केले.

यावेळी विचार मंचावर राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, उपाध्यक्ष भुवनेश दुसाने तसेच तालुकाध्यक्ष समाधान मैराळे तसेच मान्यवरांत डॉ.अनिल शिंदे, तिलोत्तमाताई आदि उपस्थित होते.

धरण संघर्ष समिती अध्यक्ष सुभाष चौधरी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तिलोत्तमा पाटील, ऍड.तिलोत्तमा पाटील, एन के पाटील, तसेच काँग्रेस तालुकाध्यक्ष बी के सुर्यवंशी,के.डी. पाटील, गोकुळ बोरसे, प्रवीण जैन, जे एम पाटील, नरेंद्र संदानशिव, सोमचंद संदानशिव, त्याचप्रमाणे मनोहर पाटील, उमेश पाटील, श्याम पाटील, एस डी देशमुख, प्रवीण देशमुख, गणेश नकवाल आदिंनी या यात्रेचे स्वागत करीत पाठींबा दर्शविला आहे. व्यासपीठावर वैभव स्वामी, अरफाक मिर्झा, हे देखील उपस्थित होते.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष, भडगावचे स्व.प्रमोद सोनवणे यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कुटुंबियांना विम्याचे १० लाख रु. मिळाल्याचे अध्यक्षांनी सांगितले. त्याचप्रमाणे स्थानिक पत्रकार संघातर्फे या यात्रेला ५ हजाराचा निधी देण्यात आला. अतिथींच्याहस्ते मतिमंद विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले. प्रास्ताविक प्रा.डॉ.विजय गाढे तर सूत्रसंचलन यदुवीर पाटील यांनी केले.

ही यात्रा आधी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला विनम्र अभिवादन करुन आली. यावेळी जेष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष समाधान मैराळे, सचिव सुरेश कांबळे, उपाध्यक्ष नूरखॉं पठाण व प्रवीण बैसाणे कोषाध्यक्ष हितेंद्र बडगुजर, संघटक आत्माराम अहिरे, सोपान भवरे, गणेश चौहान, योगेश पाने, योगेश पाने, सुरेंद्र जैन, आदिंनी अतिथींचे स्वागत केले.

Protected Content