पाचोरा रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात साजरा (व्हीडीओ)

15a69244 ee89 42f2 a3a5 059d52b9b0dd

 

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा -भडगाव रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात साजरा झाला. शहरातील भडगाव रोडवरील स्वामी लाॅन्सवर दि.२० रोजी सायंकाळी पदग्रहण सोहळा झाला. प्रांतपाल शब्बीर शाकीर व उपप्रांतपाल डाॅ. राहुल कुलकर्णी उपस्थीत होते. प्रा. रोहन पाटील यांनी नूतन अध्यक्ष डाॅ. भुषण मगर यांना अध्यक्षपदाची काॅलर सोपवली. मावळते सचिव नंदू प्रजापत यांनी नूतन सचिव डाॅ. बाळकृष्ण पाटील यांना सचिवपदाची पिन प्रदान केली.

 

पाचोरा – भडगाव रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष प्रा.रोहन पाटील यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या समाजोपयोगी कार्याचा लेखाजोखा मांडला .तर रोटरीक्लबचे सन २०१९ -२० चे नूतन अध्यक्ष डाॅ. भूषण मगर यांनी येत्या वर्षभरात करावयाच्या विविध उपक्रमांसंदर्भात माहिती दिली. नविन सदस्यांचे रोटरी पिन लावून स्वागत करण्यात आले.रोटरी डिस्टिक वर निवड झालेल्या राजेश मोर, सुयोग जैन , रूपेश शिंदे, प्रदीप पाटील , अतुल शिरसमणे यांचा सत्कार करण्यात आला. रोटरी परिवारातील प्रणिता मोर या विद्यार्थीनीची एम. एस . अभ्यासक्रमासाठी अमेरिकेत निवड झाल्याने तिला सन्मानित करण्यात आले.

 

सुयोग जैन यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.या पदग्रहण सोहळ्यास पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील,डाॅ. राजेश पाटील , अमोल शिंदे, तुषार चित्ते , केतन पटेल , विनोद जाधव , जयप्रकाश येवले, चाळीसगाव येथील किशोर पाटील ढोमणेकर, धीरज दळवी,प्रशांत कोतकर, संजय कुमावत, राजेश काळे , किशोर पाटील कूंझरकर , जीवन जैन, राजेश मोर , डाॅ. रामकृष्ण तेली , डाॅ. सागर गरूड , डाॅ. भरत पाटील, यांच्यासह पाचोरा व भडगाव येथील डाॅक्टर्स ,रोटरीचे सदस्य प्रतिष्ठत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रा. रोहन पाटील यांनी प्रास्ताविक केले. तर प्रा. शिवाजी शिंदे यांनी सुत्रसंचलन केले. तर डाॅ. बाळकृष्ण पाटील यांनी आभार मानले .

 

Protected Content