भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील ६२ वर्षीय वृध्दाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी २० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकील आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मदन नामदेव परदेशी (वय-६२) रा. कंडारी ता.भुसावळ जि.जळगाव असे मयत वृध्दाचे नाव आहे.
नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, मदन परदेशी हे आपल्या पत्नी व तीन मुलांसह भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे वास्तव्याला होते. शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे बुधवारी २० सप्टेंबर रोजी ते घरी एकटे असतांना दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही. शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने धाव घेतली. त्यांना खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.