अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील कासार गल्लीतील वृध्दाचे बंद घराचे कुलूप तोडून घरातून टीव्ही, कुलर, गॅस शेगडी, सिलेंडर सह रोकड असा एकुण ६२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना गुरूवारी २७ जून रोजी उघडकीला आले आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अमळनेर शहरातील कासार गल्लीत डॉ. राजेंद्र काशिनाथ पिंगळे वय ६२ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. वैद्यकीय सेवा करून ते आपला उदरनिर्वाह करतात. १४ जून रोजी त्यांचे घर बंद होते. दरम्यान त्यांच्या परिसरात राहणारे दिनेश गंगाराम महाजन, अनिल गंगाराम महाजन आणि गंगाराम निंबा महाजन सर्व रा. कासार गल्ली, अमळनेर यांनी त्यांचे घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून टीव्ही, कुलर, गॅस शेगडी, सिलेंडर सह रोकड असा एकुण ६२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे गुरूवार २७ जून रोजी उघडकीला आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर डॉ. पिंगळे यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार देण्यात आली. त्यानुसार सायंकाळी ५ वाजता चोरी करणारे दिनेश गंगाराम महाजन, अनिल गंगाराम महाजन आणि गंगाराम निंबा महाजन सर्व रा. कासार गल्ली, अमळनेर यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ हे करीत आहे.