प्रांताधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाचे शनिवारी होणार आ. किशोर पाटील यांच्या हस्ते उदघाटन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील प्रांताधिकारी यांच्या  शासकीय निवासस्थानाचे शनिवारी आ. किशोर पाटील यांचे हस्ते उदघाटन होणार आहे.

 

पाचोरा उपविभागीय अधिकारी यांच्यासाठी हक्काचा निवारा असावा या भावनेतून व आ. किशोर पाटील यांच्या पाठपुराव्याने तथा तत्कालीन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या कार्यकाळात सूरु झालेल्या प्रांताधिकारी निवासाच्या प्रवासाची फलनिष्पत्ती झाली आहे.  सुमारे ५९ लाख रुपये खर्चून भडगाव रोडवरील शासकीय विश्राम गृहाच्या परिसरात साकारलेल्या शासकीय निवास्थानाचे उद्घाटन शनिवार  दि. ८ आॅक्टोबर  सकाळी ११ वाजता आ. किशोर पाटील यांचे हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे, भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दिपक पाटील, उपअभियंता काजवे, अभियंता, उद्योगपती मुकुंद बिल्दीकर, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख सुनिल पाटील, माजी जि. प. सदस्य पदमसिंग पाटील, माजी जिल्हा उपप्रमुख गणेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, बाजार समितीचे माजी संचालक शिवदास पाटील, अनिल धना पाटील, डॉ. भरत पाटील, माजी सभापती पंढरीनाथ पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, बंडू चौधरी, प्रवीण ब्राह्मणे यांचे सह सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

शासकीय अधिकारी कर्तव्यावर असतांना त्यांना घरी आल्यावर हक्काचे निवासस्थान असावे अशी अनेक वर्षांपासून मागणी होत होती. त्याची दखल घेत आ. किशोर पाटील यांनी शासनाकडे या मागणीचा पाठपुरावा केला होता.

 

आमदार किशोर पाटील यांनी याबाबत सांगितेल की ,  पाचोऱ्यात तहसिलदार, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, अभियंते, पोलिस बांधव यांच्यासाठी देखील हक्काचा निवासस्थान असावे. तसेच प्रत्येक गावात तलाठी कार्यालय असावे यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे. लवकरच सर्व अधिकाऱ्यांच्या व पोलीस बांधवांच्या निवासस्थानाचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे.

 

Protected Content