Home राजकीय शिवतीर्थावर उसळला जनसागर ; थोड्याच वेळात शपथविधीला सुरुवात

शिवतीर्थावर उसळला जनसागर ; थोड्याच वेळात शपथविधीला सुरुवात


download 1 2
 

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीच्या सरकारच्या शपथविधीला थोड्याच वेळात शिवतीर्थावर सुरुवात होणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी जनसागर उसळला आहे.

महाविकासआघाडीच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्यांच्यासह आणखी सहा मंत्र्यांचा शपथविधीही यावेळी पार पडेल. हा सोहळा स्मरणीय करण्यासाठी शिवसेनेकडून तयारीत कोणतीही कसूर ठेवण्यात आलेली नाही. सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी शपथविधीसाठी खास असे व्यासपीठ उभारले आहे. एकूणच शिवाजी पार्कमधील आजचा सोहळ्यासाठी मोठा जनसागर उसळला आहे.


Protected Content

Play sound