यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढीस लागले असून आजवरच्या रूग्णांची संख्या अकराशेच्या पार गेल्याचे दिसून येत आहे.
यावल तालुक्यात आज तब्बल १०६ रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे आजवरच्या बाधीतांचा आकडा हा १११८ इतका झालेला आहे. यातील ८१७ रूग्ण बरे झाले आहेत. तर २५३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आजवर तालुक्यात ४८ रूग्ण मृत झाले आहेत.
तालुक्यातील ग्रामीण परिसरात कोरोना विषाणु संसर्गाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असतांना दुसरीकडे अनेक गावांची वाटचाल ही कोरोना मुक्तीकडे होत असल्याचे आकडेवारीतुन स्पष्ट होत आहे. यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना मुक्तीकडे वाटचाल करणारे गावामध्ये भालोद प्राथमिक आरोग्य केन्द्रा अंतर्गत येणार्या ७ गावांचा समावेश असुन त्यात अट्रावल ०, चितोड०, सांगवी बु॥ ०, चिखली०, डोंगर कठोरा ०, चिखली खु॥ ० , राजोरा ० , हिंगोणा प्राथमिक आरोग्य केन्द्रा अंतर्गत हिंगोणा हे गाव कोरोना मुक्त आहे. सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केन्द्रा अंतर्गत येणारे सावखेडा सिम, कोरपावली , दहिगाव ,सातोद, महेलखेडी , मोहराळा अशी सहा गावे ही कोरोना मुक्त झाली आहेत तर किनगाव प्राथमिक आरोग्य केन्द्रा अंतर्गत आडगाव या एकमात्र गावात आज कोरोना रूग्ण नाही.