एरंडोलमध्ये कोरोना बाधीतांचा आकडा हजाराच्या पार

 

एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून आजवरच्या बाधीतांच्या आकड्याने हजारी गाठली आहे.

चाळीसगाव तालुक्यात आज ४२ नवीन बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. आजच्या आकडेवारीमुळे तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या १००५ इतकी झालेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे यातील ६५१ रूग्ण बरे झाले आहेत. आजच ३६ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर मयतांची एकंदरीत संख्या २४ इतकी झालेली आहे. तर तालुक्यातील ३३० रूग्ण सध्या उपचार घेत आहेत.

एरंडोल तालुक्यात पहिल्या टप्प्यात बरेच दिवसांपर्यंत कोरोनाचा संसर्ग आढळून आला नव्हता. तथापि, नंतर कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याचे दिसून आले आहे.

Protected Content