जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात तब्बल ५७१ रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे लागोपाठ तिसर्या दिवशी पाचशेच्या वर रूग्ण आढळून आले असून यात जळगाव, चाळीसगाव, चोपडा तालुक्यात पुन्हा संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना बाधीतांबाबतची माहिती जाहीर केली आहे. यानुसार आज जिल्ह्यामध्ये ५७१ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक १४१ रूग्ण हे जळगाव शहरातील असून चाळीसगाव-७८, चोपडा-५६ असे आहे. त्या खालोखाल जळगाव ग्रामीण- ४७, भुसावळ-२८, अमळनेर-१७, पाचोरा-१४, भडगाव-०९, धरणगाव-४०, यावल-१७, एरंडोल-१७, जामनेर -३०, रावेर -१६, पारोळा-३०, मुक्ताईनगर-२१ आणि इतर जिल्हे १० असे एकुण ५७१रूग्ण आज आढळून आले आहे.
तालुकानिहाय एकुण आकडेवारी
जळगाव शहर- ३९३२, जळगाव ग्रामीण-८११, भुसावळ-१०८५, अमळनेर-११५६, चोपडा-११६६, पाचोरा-६३०, भडगाव-६९९, धरणगाव-७६७, यावल-५६५, एरंडोल-८५६, जामनेर-११६६, रावेर-८१७, पारोळा-६४१, चाळीसगाव-८२८, मुक्ताईनगर-४९८, बोदवड-२६९, इतर जिल्हे-७६ असे एकुण १५ हजार ९६२ रूग्णांची संख्या झाली आहे.
आजच्या आकडेवारीने जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ही १५ हजार ९६२ इतकी झाली आहे. यातील १० हजार ९८१ इतके रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात आजच ३०१ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजवर ६२७ रूग्णांचा मृत्यू झाला असून ४ हजार ३५४ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती या प्रेस नोटमध्ये दिलेली आहे.
jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update