ग.स.सोसायटीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष भदाणे यांचा अमळनेर येथे सत्कार (व्हिडीओ)

949f0474 e78e 443d 9ce0 aa7b66241055

अमळनेर (प्रतिनिधी) येथील पुज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या वतीने नुकताच जळगांव ग.स.सोसायटीत उपाध्यक्षपदी निवड झालेले व वाचनालयाचे माजी अध्यक्ष श्यामकांत भदाणे यांचा सत्कार वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात केला.

 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिटणीस प्रकाश वाघ यांनी केले. वाचनालयाचे जेष्ठ संचालक भीमराव जाधव यांनी यावेळी म्हटले की, जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग.स. पतपेढीत श्यामकांत भदाणे यांची उपाध्यक्षपदी निवड होणे म्हणजे
त्यांच्या आतापर्यंत केलेल्या कामांची पावतीच आहे. अध्यक्षीय भाषणात वाचनालयाचे अध्यक्ष म्हणाले की, भदाणे यांचा अभ्यास दांडगा आहे, त्यांनी आतापर्यंत अनेक पदे भुषवून न्याय देण्याचे काम केले आहे. त्यांच्या हातून अधिक सामाजिक सेवा होऊन पतपेढीच्या विकासासाठी त्यांचा हातभार लागेल. कर्मचारी वर्गाच्या हिताच्या योजना आणतील.

त्यांचा सत्कार वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, चिटणीस प्रकाश वाघ, संयुक्त चिटणीस सुमीत धाडकर, जेष्ठ संचालक भीमराव जाधव,माजी उपाध्यक्ष नगिनचंद लोढा, निलेश पाटील, ईश्वर महाजन,प्रसाद जोशी यांनी शाल, श्रीफळ व बुके देऊन केला.

सत्काराला उत्तर देतांना ग.स.पतपेढीचे उपाध्यक्ष भदाणे म्हणाले की, पुज्य सानेगुरुजी वाचनालयाच्या वतीने माझा पदाधिकारी यांनी सन्मान केला, त्यामुळे निश्चितच मला काम करण्यास प्रेरणा मिळेल. शिक्षक व कर्मचारी हितासाठी व पतपेढीच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहून काम करेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर महाजन यांनी तर आभार प्रदर्शन सुमित धाडकर यांनी केले.

 

Add Comment

Protected Content