मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत नवनिर्वाचित झालेल्या सदस्यांचा २८ जुलै रोजी शपथविधी होणार आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देणार आहेत. यामध्ये भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांचाही समावेश आहे. 2019 मध्ये पराभूत झाल्यानंतर त्या मुख्य राजकारणापासून बाजूला झाल्या होत्या. त्यानंतर अनेकदा विधान परिषद किंवा राज्यसभेवर त्यांची वर्णी लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. अखेर लोकसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आता पक्षाने त्यांची विधान परिषदेवर वर्णी लावली आहे.
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान पार पडले होते. या वेळी निवडून आलेल्या सर्व सदस्यांना 28 जुलै रोजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून शपथ दिली जाणार आहे. यामध्ये योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडणार आहे. विधानभवनातील सेंट्रल हॉल मध्ये रविवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वाजता हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.