लाईव्ह ट्रेंडस न्यूज – विशेष लेख | कोरोना महामारी नंतर लोकांना आपल्या स्वतःच्या आरोग्याची चांगलीच जाणीव झाली आहे, आपण किती हि सावध राहिलो तरी देखील आरोग्य संबंधीत समस्या केव्हा उदभवतील याचा काही भरोसा नाही. कोरोना काळात अचानक लाखो लोकांना कोरोनाने जखडलं होत, तेव्हा सामान्य माणसाच्या पुढे एकच समस्या मोठी उभी राहिली होती ती म्हणजे पैसा.
प्रत्येक कुटुंब प्रमुखाला आपल्या परिवाराची चिंता या करीत होती कि जर अचानक आपल्या घरात कोरोना आला तर पैसे कुठून उभे करायचे? आणि अशातच लाखो लोकांचा बळी हा खिशात पैसे नसल्याने आणि चांगले उपचार न मिळाल्याने सुद्धा गेलाय. पण ज्यांच्याकडे मेडिक्लेम किंवा हेल्थ इन्शुरन्स होता, ते अगदी निवांत होते. हे शक्य झाले आरोग्य विम्यामुळे. आज आम्ही या लेखामध्ये हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय ? चांगला हेल्थ इन्शुरन्स प्लॅन कसा निवडावा, त्यासाठी कोणते कागदपत्र तुम्हाला लागतात, इत्यादीबद्दल माहिती देणार आहोत.
‘Health Insurance’ म्हणजेच ‘आरोग्य विमा’ ज्याला ‘मेडिक्लेम’सुद्धा म्हटले जाते. हा एक प्रकारचा विमा आहे जो अपघात, आजार किंवा गंभीर आजारामुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती मध्ये खर्चापासून तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करतो. यामुळे जर एखादा मोठा अपघात झाला, किंवा आजार झाला, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती ओढावली तर विमाधारकाला पैसे भरावे लागत नाहीत. रुग्णाचे घरून आणण्यापासून ते पूर्ण उपचाराचा खर्च हेल्थ ईन्शुरन्स कंपनी करते. आणि आपण योग्य ते उपचार घेऊन घरी सुखरूप परत येतो.बहुतेक आरोग्य विमा पॉलिसी कॅशलेस उपचार, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरच्या खर्चाचे संरक्षण, रुग्णवाहिका कव्हर इत्यादी फायदे देतात.
हेल्थ इन्शुरन्स घेणे का आवश्यक आहे ?
आपल्या व्यस्त जीवनामुळे आपण अनेकदा आपल्या आरोग्याकडे आणि त्याच्याशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करतो. आपण आपल्या आरोग्याकडे ज्या प्रकारे लक्ष दिले गेले पाहिजे तसे लक्ष देऊ शकत नाही आहोत. आजच्या आधुनिक आणि वेगवान जीवनात सर्व लोक आपापल्या कामात खूप व्यस्त झाले आहेत. आपण आपल्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत काही क्षण घालवण्यासाठी वेळ सुद्धा काढू शकत नाही.
आपल्याकडे कामाचा एवढा ताण आहे की आम्ही सध्या ऑफिस आणि घरी दोन्ही ठिकाणी काम करतोय. आपल्या कामामुळे आपले सामाजिक जीवन अतिशय गोंधळून गेले आहे आणि वेळेच्या या अभावाचा परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतो. प्रत्येकाने आरोग्य विमा घेणे आवश्यक आहे. जीवनात कधी घडते, आजकाल एखादी चांगली व्यक्ती दुसऱ्याकडून दुखावली जाते, कधीकधी त्याला दुखापत होते. अपघात होतो. अशा परिस्थितीत, आयुष्यभर मिळणारी कमाई उपचार घेण्यामध्ये निघून जाते. खूप लोक घर सुद्धा विक्री करा. या प्रकारचा त्रास टाळण्यासाठी, आपण आरोग्य विमा घेणे आवश्यक आहे.
– मनिष दिलीप चांदेलकर
आरोग्य व वाहन विमा सल्लागार