आसोदा, प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील आसोदा सार्वजनिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नावे थेट मंगळावर पोहचणार असून ही एक ऐतिहासिक नोंद होणार आहे.
नासा नॅशनल एरोनोटिक्स अॅड स्पेस अॅडमिनीस्ट्रेशनचे मंगळ रोव्हर २०२० हे अंतरिक्षयान जुलै २०२० ला लालग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे. या अंतरिक्षयानावर स्टेन्सिल्ड चिपवर आपली नांवे पाठवून मानवी इतिहासात दुसऱ्या ग्रहावर आपल्या पाऊलखुणा सोडण्याची ऐतिहासीक संधी नासाच्या वतीने जगभरातील सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करुन दिली आहे. ही मोहीम मंगळ मोहीमेच्या प्रवासापर्यतच्या मिशन ला उद्देशून सार्वजनिक सहभाग मोहीमेतंर्गत राबवत आहे.नासाच्या कॅलिफोर्निया येथील जेट पॉप्युलेशन लॅबोरेटरीतल्या मायक्रो डिव्हायसेस लॅबोरेटरीमध्ये इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सिलीकॅनच्या चिपवर आपण नोंदवलेली नांवे लिहीली जाणार आहेत. या चिपवर रो०हरवर काचेच्या आवरणाखाली जतन करून मंगळावर पाठवल्या जातील.या उपक्रमासाठी विज्ञान समिती प्रमुख गोपाळ महाजन यांना लालसिंग पाटील, प्रेमराज बऱ्हाटे, सचिन जंगले, संतोष कचरे, वृषाली चौधरी, हेमलता साळुंखे, भारती पाटील या विज्ञान शिक्षकांनी सहकार्य केले. या उपक्रमाचे कौतुक व अभिनंदन संस्थाध्यक्ष विलास चौधरी, संस्थेचे सचिव कमलाकर सावदेकर ,चेअरमन उद्धव पाटील व संचालक मंडळ मुख्याध्यापिका विद्या खाचणे, पर्यवेक्षक डॉ. मिलिंद बागूल यांनी कौतूक केले.