मुस्लीम कुटुंबातही ‘नरेंद्र मोदी’चा जन्म !


Master 1

लखनऊ (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीच्या मजमोजणीच्या दिवशी (२३ मे) संपूर्ण भारतात पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अभूतपूर्व विजयश्री मिळत असताना उत्तर प्रदेशातील गोंडा या शहरात मुस्लीम कुटुंबात झालेला बालकाचा जन्म हा पंतप्रधान मोदींच्या विजयोत्सवाचा साक्षीदार ठरला आहे. ही स्मृती कायमस्वरूपी जपत या मुस्लीम कुटुंबाने आपल्या बालकाचे नाव नरेंद्र मोदी असे ठेवले.

 

मुस्लीम कुटुंबातील या बालकाचा जन्म २३ मे या लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशीच झाला. या बालकाचे नाव नरेंद्र मोदी असे ठेवत या मुस्लीम कुटुंबाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबददल आपले प्रेम प्रकट करून सर्वधर्मसमभावाचे एक अनोखे उदाहरण समाजापढे ठेवले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here