‘त्या’ दोन महिलांचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे निष्पन्न (व्हिडीओ)

e7ee3b6c 6146 4a91 856c e685496eb02d

रावेर, प्रतिनिधी । तालुक्यातील केऱ्हाळे खुर्द येथील शेतामध्ये काल दोन महिलांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. या महिलांच्या मृत्यूप्रकरणी आज अवघ्या आठ तासात पोलिसांनी गावातीलच दोघा आरोपींना अटक केली आहे. त्यांनी अनैतिक संबंधांच्या कारणावरून दोघा महिलांचा खून केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी दोघा आरोपींच्या तपासासाठी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे.

 

अधिक माहिती अशी की, आरोपी कैलास गुना गाढे (वय ५७) व लक्ष्मण किसन निकम (वय ६०) (रा. केऱ्हाळे खुर्द) यांनी दिलेल्या कबुलीनुसार त्या दोघांचे अनुक्रमे गावातीलच नशिबा रुबाब तडवी (वय ४६) व शालुबाई गौतम तायडे (वय ५७) यांच्याशी अनैतिक संबंध होते. पण त्या दोघी या संबंधात प्रामाणिक राहत नसून त्या अन्य पुरुषांशीही अनैतिक संबंध ठेवत असाव्या, अशा संशयातून त्याचा आरोपींना राग होता. दरम्यान त्या दोघी खेडी जंगलातील विठठल नारायण सोनवणे यांच्या दरीच्या शेताचे व त्यापासून थोड्या अंतरावर नारायण रामचंद्र पाटील यांच्या कपाशीच्या शेतात कापूस चोरण्यासाठी आल्या असल्याची माहिती कळल्यावरून दोघांनी संगनमत करून त्यांना तेथे गाठले. दोघांनी तेथे आधी त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर त्यांची गळा दाबून व चाकूने वार करून निर्घृण हत्त्या केली.

पोलिसांनी या दोघांना आज सकाळी ६.०० च्या सुमारास अटक केली आहे. दरम्यान संजय गौतम तायडे (वय ३५, धंदा मजुरी) याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दोघांविरुध्द भाग-५ गुरन १८७/२०१९ भादवी कलम ३०२ वाढीव कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

 

 

Protected Content