बोदवड – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रेमसंबंध असल्याचा राग मनात ठेवून नऊ जणांनी कट रचून २७ वर्षीय तरूणाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी गोकुळ पारधी (वय-२९) रा. मुक्तळ ता. बोदवड असे मयत तरूणाचे नाव आहे. शिवाजी पारधी हा तरूण ५ मार्च पासून घरातून बेपत्ता होता. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे. दरम्यान शिवाजी पारधी यांचा मृतदेह मलकापूर रोडने बोदवड शिवारातील पुलाच्या खाली मयतस्थितीत आढळून आला होता. याप्रकरणी बोदवड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. शिवाजी पारधी आणि रविना उर्फ धनश्री सचिन कोल्हे (वय-२१) रा. मुक्तळ ता. बोदवड यांचे प्रेमसंबंध होते. यांचा राग ठेवून नऊ जणांना बेदम मारहाण करून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी मयत शिवाजीचा भाऊ सुनिल पारधी याच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस ठाण्यात संशयित आरोपी रविना उर्फ धनश्री सचिन कोल्हे (वय-२१), सचिन श्रीधर कोल्हे, श्रीधर रामधन कोल्हे, अमोल श्रीधर कोल्हे, नितीन भास्कर कोल्हे, निर्मलाबाई श्रीधर कोल्हे, सर्व रा. मुक्तळ ता. बोदवड, पुंडलीक यशवंत वारके, पल्लवी पुंडलीक वारके, भाग्यश्री अमोल कोल्हे, तिन्ही रा. सिंधी ता. भुसावळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी आठ जणांना बोदवड पोलीसांनी अटक केली आहे.