मुंबई (वृत्तसंस्था) आज कर्नाटकात जेडीएस आणि कॉंग्रेस सरकारची शक्ती परीक्षा आहे. त्याताच रात्री अचानक काँग्रेसचे एक आमदार गायब झाल्यामुळे काँग्रेसला आणखी एक धक्का बसला होता. परंतू गायब आमदार मुंबईत रुग्णालयात उपचार घेत असल्याचे पुढे आले आहे.
काँग्रेस आणि जेडीएसने कोणताही धोका नको म्हणून आपल्या आमदारांना कर्नाटकमध्ये एका हॉटेलवर ठेवले होते. मात्र, कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील काल रात्रीपासून अचानक गायब झाले होते. श्रीमंत पाटील हे इतर काँग्रेस आमदारांसह रिसॉर्टवर होते. तिथून ते वैयक्तिक कामाचे कारण देत कालपासून गायब झाले होते. कुमारस्वामी सरकारची आज विश्वासदर्शक ठरावाची कसोटी आहे. त्यात आणखी एक आमदार कमी झाल्याने मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारची डोकेदुखी वाढली आहे. १३ बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यानंतर आणखी एक आमदार आज शक्तीपरीक्षणाच्या वेळी गैरहजर राहणार असल्याचे स्पष्ट आहे.