अमेरिकेकडे मिसाइल हल्ल्याची पूर्वसूचना देणारी यंत्रणा

missile 1

बगदाद, वृत्तसंस्था | इराणने इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांना लक्ष्य केले असून इराणने अमेरिकेच्या या तळांवर १२ बॅलेस्टिक मिसाइल्स डागले आहेत. पण त्यातून इराणला अपेक्षित असणारे काहीही घडलेले नाही. इराणने अमेरिकेचे ८० सैनिक ठार झाल्याचा दावा केला आहे. पण अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी All is well! असे टि्वट केले आहे.

 

म्हणजे अमेरिकन सैन्याची जिवीतहानी झालेली नाही असेच ट्रम्प यांनी सूचित केले आहे. इराणने टॉप लष्करी कमांडर जनरल कासिम सुलेमानीच्या मृत्यूचा बदला घेण्याची धमकी दिली होती. शुक्रवारी पहाटे अमेरिकेच्या एअर स्ट्राइकमध्ये सुलेमानीचा मृत्यू झाला होता. सूड घेण्याच्याच इराद्यानेच इराणने इराकमधील अमेरिकेच्या तळांवर बॅलेस्टिक मिसाइल्स डागली. पण त्यातून इराणला अपेक्षित परिणाम साधता आला नाही.

पूर्वसूचना देणारी यंत्रणा
अमेरिकेने बॅलेस्टिक मिसाइल हल्ल्याची पूर्वसूचना देणारी यंत्रणा विकसित केली आहे. इराणकडून हल्ला होण्याची शक्यता असल्याने, अमेरिकेने इराकमधील आपल्या दोन्ही तळांवर आधीपासूनच तयारी करुन ठेवली होती. “पूर्वसूचना देणाऱ्या या यंत्रणेकडून मिसाइल हल्ल्याची माहिती मिळताच वेळेत सर्व नागरिकांनी बंकर्समध्ये हलवण्यात आले” अशी माहिती अमेरिकन लष्कराच्या अधिकाऱ्याने सीएनएन या वृत्तवाहिनीला दिली.
बॅलेस्टिक मिसाइल अर्ली वॉर्निंग सिस्टिम म्हणजे हे एक रडार आहे. काही देशांच्या मदतीने अमेरिकेने हे रडार विकसित केले आहे. शीत युद्धाच्याकाळात सोव्हिएत युनियनबरोबर अमेरिकेचा संघर्ष सुरु होता. त्यावेळी सोव्हिएतने आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्यास आगाऊ माहिती मिळावी, यासाठी हे रडार बनवण्यात आले होते.

Protected Content