Home क्राईम अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले


फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दुसखेडा येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील दुसखेडा येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १६ जून रोजी सकाळी ११ वाता मैत्रीणीकडे जावून येते असे सांगून ती घराबाहेर पडली. दरम्यान सायंकाळपर्यंत मुलगी घरी न आल्याने कुटुंबियांनी चिंता व्यक्त करत तिचा नातेवाईकांसह मैत्रीणींच्या घरी शोधाशोध केली परंतू कुठेही आढळून आली नाही. पिडीत मुलीच्या भावाने फैजपूर पोलीस ठाण्यात येवून अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याबाबत तक्रार दिली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे करीत आहे.


Protected Content

Play sound