यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा बँकेने मधुकर सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर द्यावा. यामुळे शेतकरी, सभासद, कामगार यांचे हित जोपासले जाईल. शेतकऱ्यांना दिलेल्या ऊसाची रक्कम मिळेल. अशी मागणी करत याप्रकरणी सभासद राजेंद्र महाजन आणि महेंद्र धांडे यांनी याप्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
गेल्या ४२ वर्षात नियमित गाळप करणाऱ्या मधुकर सहकारी साखर कारखाना म्हणजे काही आर्थिक अडचणींमुळे बंद झाला. कारखाना बंद झाला तेव्हा या कारखान्यांवर इतर कारखान्याप्रमाणे फार मोठे कर्ज नव्हते; परंतु शेतकऱ्यांची उसाची (FRP) रक्कम देणे करण्यात आले. त्याचा परिणाम पुढील वर्षी गाळप हंगाम बंद राहिले आणि साखर कारखान्यावर मोठ्या प्रमाणात भार पडला. आर्थिक नुकसान वाढत राहिले.
जिल्हा बँकेने कारखाना ताब्यात घेतला. त्यानंतर कारखाना भाडेतत्वावर देण्यात येईल. असे बँकेच्या वतीने सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात तसे न करता कारखाना विक्री करण्याचे ठरविले. त्यामुळे कारखान्याच्या सभासदांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली. कारखान्याचे सभासद राजेंद्र महाजन आणि महेंद्र धांडे यांनी याप्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. जेणेकरून कारखाना विक्री न करता भाडेतत्वावर देण्यात येईल आणि यामुळे शेतकरी, सभासद, कामगार यांचे हित जोपासले जाईल. शेतकऱ्यांना दिलेल्या ऊसाची रक्कम मिळेल. या रिट पिटीशनवर लवकरच सुनावणी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.