जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवार (दि. 19 जुलै) रोजी दुपारी जळगाव जिल्हा नियोजन भवनात आयोजित करण्यात आली आहे.
दुपारी १ वाजेला ही बैठक होणार असून या बैठकीत दिनांक 8 मार्च, 2019 रोजीच्या बैठकीच्या इतिवृत्तास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2018-2019 माहे मार्च 2019 अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेणे, (सर्वसाधारण, अनुसुचित जाती उपयोजना, जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम) जिल्हा वार्षिक योजना 2019-2020 चे नियोजन (सर्वसाधारण, अनुसुचित जाती उपयोजना, जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम) जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जिल्हा परिषदेकडील अखर्चित निधीचा आढावा घेणे, मा.अध्यक्षांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषयांवर चर्चा आणि कार्यवाही होणार आहे.
या बैठकीस जिल्ह्यातील खासदार, आमदार व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व सर्व कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी यांनी वेळेवर उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.