भुसावळ, प्रतिनिधी । शहरातील जामनेर रोड, स्टेट बँक शाखा आनंद नगर जवळ चार दिवसांपूर्वीच मालती संज्योत कोविड सेंटर सुरू करण्यात आले असून कोरोना बाधित उपचार घेणाऱ्या रुग्णांना २४ तास ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आल्याने रुग्णांसाठी उपचार करणारे डॉक्टर “देवदूत “ठरत आहे.
सध्या जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांनाची संख्या दिवसेन-दिवस वाढत आहे. प्रशासन ती संख्या आटोक्यात आणण्यासाठी उपाय योजना करण्याचे प्रयत्न करीत आहे. पण एकीकडे प्रशासन कुठेतरी अपुरे पडत असल्याने जळगाव जिल्ह्यात रुग्णालयात ऑक्सिजन तुटवडा भासत असल्याने रुग्ण दगावण्याच्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे. तर काही रुग्णालयांमध्ये रेमडीसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याने रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचे प्रकार बिनधास्तपणे सुरू आहे? रुग्णांनी अशा कोविड सेंटरला बळी पडू नये यासाठी भुसावळ शहरात शासनाच्या योग्य दरात मालती संज्योत कोविड सेंटर सुरू करण्यात आले असून सध्यास्थीतीत १९ रुग्ण उपचार घेत आहेत. विशेष रुग्णांला जीव गमविण्याची वेळ येणार नाही याची तज्ञ डॉक्टर काळजी घेत आहे.
अशा परिस्थितीत भुसावळ शहरामध्ये मालती कोविड सेंटर ४० बेडचे उभरल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे. २४ तास रुग्णांच्या सेवेसाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरात कोरोना बाधित रुग्णांची तज्ञ डॉ. आशिष सरोदे, डॉ.अजित चव्हाण, डॉ.हर्षा गुप्ता, डॉ.स्वप्नील सोनवणे, डॉ.संदेश खांडेकर स्टॉप उपलब्ध आहे. तसेच रुग्णांच्या सेवेसाठी बीएससी प्रशिक्षित ८ नर्सिंग व वार्ड बॉय तसेच हॉस्पिटलची स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. रुग्णांसाठी उपचार दरम्यान कमतरता भासणार नाही यासाठी व्यवस्थापक जितेंद्र पाटील दिवस-रात्र परिश्रम घेत आहे.अशी माहिती मालती संज्योत कोविडचे प्रमुख डॉ.आशिष सरोदे यांनी पत्रकारांना दिली.
https://www.facebook.com/508992935887325/videos/1098959570600305