चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या प्रचाराचा उद्या (दि.८) दसऱ्याच्या मुहूर्तावर शुभारंभ होणार आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील सदर बाजार गल्लीतील, आडवा बाजार भागात असलेल्या ग्रामदैवत आनंदा माता मंदिरात त्यांच्या हस्ते सकाळी ८.३० वाजता महाआरती करण्यात येवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महायुतीतर्फे करण्यात आले आहे.