आत्मविश्वास, योग्य नियोजन व पुनरावृत्ती यशाची गुरुकिल्ली


जळगाव (प्रतिनिधी) येथील उर्दू कबिला, अलफैज व बिबा फाउंडेशनतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरात ‘परीक्षापासून भय कसला ?’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने कांताई सभागृहात नुकताच पार पडला.

पवित्र कुराण पठणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उर्दू कबीराचे अध्यक्ष मुश्ताक करिमी यांनी यावेळी प्रास्ताविकात आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, जीवनात सकारात्मक दृष्टीकोन ठेवणाऱ्यांनी मोठे यश प्राप्त केले आहे. शिबिराचे उद्घाटन उद्योजक मजिद झकेरिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष तथा ए.टी.एम.चे चेअरमन फारुक शेख, व अब्दुल गफ्फार मलिक यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात करीम सालार म्हणाले की, आपल्या क्षमता ओळखा आणि चांगला माणूस होण्यासाठी शिक्षण आत्मसात करा. या शिबिरात आरिफ मोहम्मद खान (विज्ञान) गुलाम रसूल (इंग्रजी) साजिद रज्जाक (भूमिती) व मोहसीन खान (बीजगणित) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आत्मविश्वास योग्य नियोजन व पुनरावृत्ती यशाची गुरुकिल्ली आहे. असा सूर त्यांच्या विचारातून उमटला २० वर्षापासून विद्यार्थ्यांना मनापासून मार्गदर्शन करणारे शिक्षकांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.यामध्ये सय्येद इरतेकाज साबिर, जाकिर बशीर ,आरिफ खान, रोशन मुश्ताक ,मोहसिन खान, शकील सलीम, इफ्तेखार गुलाम रसूल, खान अतिक व साजिद रज्जाक यांचा समावेश होता.

शिक्षकांनी दिल्या टिप्स

१)कठीण वाटणाऱ्या विषयांचा अभ्यास सकाळी करा
२)सकाळी लवकर उठा व रात्री लवकर झोपा रात्री लवकर झोपा.
३) ताण रहीत अभ्यास करा ४)पुनरावृत्ती ला प्राधान्य द्या ५)सोशल मीडियापासून दूर रहा
६ पौष्टिक व सकस आहार घ्या
७)नवीन पाठ्यपुस्तकांना खूप खूप वाचा.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इफ्तेखार शेख तर आभार मुश्ताक करिमी यांनी मानले.

Add Comment

Protected Content