जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगर भागातील एका बैलगाडीचे लोखंडी चाक अज्ञात चोरट्याने चोरून नेण्याची घटना शुक्रवार २२ सप्टेंबर रोजी उघडकीला आले आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,, हेमांग हितेंद्र मेहता हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. वकिलीचा व्यवसाय करून तो आपला उदरनिर्वाह करतो. दरम्यान त्यांच्या मालकीचे शिवाजीनगर भागात सर्वे नंबर 511 येथे शेत आहे. या शेतात त्यांनी त्यांच्या मालकीचे लोखंडी बैलगाडी ठेवलेली होती. दरम्यान गुरुवार २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते शुक्रवार २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९.१५ वाजेच्या दरम्यान त्यांच्या शेतात ठेवलेले बैलगाडीचे लोखंडी चाक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर हेमांग मेहता यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक योगेश पाटील करीत आहे.