नवी दिल्ली प्रतिनिधी । भारतीय महिला क्रिकेट संघाने आज झालेल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघावर ८ गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासोबतच भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. हा सामना बडोदा येथे खेळण्यात आला.
आजच्या वन डे सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ४५.१ षटकात १६४ धावा करता आल्या. आफ्रिकेच्या संघाला पूर्ण ५० षटके खेळता आली नाही. त्यांचा संघ ४५ षटकातच सर्व बाद झाला. भारतीय संघाला मिळालेले १६५ धावांचे आव्हान भारतीय फलंदाजांनी पूर्ण केले. भारतीय संघाने हे आव्हान ४१.४ षटकात पूर्ण करीत आफ्रिका संघाचा दणदणीत पराभव केला. भारतीय फलंदाजासोबतच गोलंदाजांचीही कामगिरी चांगली राहिली. भारतीय संघाकडून झूलन गोस्वामीने तीन, शिखा पांडेय, पूनम यादव आणि एकता विष्ट यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. प्रिया पुनिया (७५ धावा), जेमिमा रोड्रिग्स (५५ धावा) या दोघींच्या फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने आज झालेल्या पहिल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ८ गडी राखून पराभव केला. या विजयासोबतच भारतीय संघाने तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. सामन्यात जबरदस्त खेळ करणारी प्रिया पुनिया ही ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरली आहे.