हैदराबाद एन्काउंटर अयोग्य व कायद्याला धरून नाही : उज्ज्वल निकम

 

Ujjwal Nikam

 

मुंबई (वृत्तसंस्था) हैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींचे पोलिसांनी केलेले एन्काउंटर अयोग्य व कायद्याला धरून नव्हते,’ असे स्पष्ट मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे.

अॅड. उज्ज्वल निकम यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, हा प्रकार अयोग्य आहे. ‘हे एन्काउंटर कायद्याला धरून नव्हते. मारले गेलेले आरोपी पोलिसांकडील शस्त्र घेऊन पळत होते व त्यांनी पोलिसांवर हल्ला केल्याचे सांगितले जातेय. मात्र, यात संशयास जागा आहे. मुळात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींच्या हातात बेड्या असतात. त्या असतानाही त्यांनी शस्त्रं हिसकावून घेतली असे गृहित धरले तरी हा गोळीबार योग्य नव्हता,’ असे निकम म्हणाले. प्रत्येकाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे, तसा पोलिसांनाही आहे. मात्र, हा अधिकार कधी वापरायचा याचेही काही निकष आहे.

Protected Content