पत्नीला लॉजवर नेऊन पतीने चाकूने वार करून केली हत्या

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुणे शहरात धक्कादायक घटना उघड झाली आहे. पुण्यात पतीकडून पत्नीला लॉजवर नेऊन चाकूने वार करून तिचा खून करण्यात आला आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ भागातील लॉजवर ही घटना घडली आहे. या प्रकरणात आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काजल कृष्णा कदम असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती कृष्णा कदम याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार काजल आणि कृष्णा पती-पत्नी असून ते दोघेही मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. आरोपी कृष्णाला दारुचे व्यसन असल्याने त्याचे नेहमी काजलशी वाद व्हायचे. शनिवारी दुपारच्या सुमारास कृष्णाने भारती विद्यापीठ परिसरात असलेल्या एका लॉजवर रुम बुक केली. काजल आणि कृष्णा यांच्यामध्ये घटस्फोटाचे प्रकरण सुरू होते. या दोघांनी पुन्हा एकत्र राहण्याचा विचार केला होता. त्यामुळे कृष्णाने काजल हिला चर्चेसाठी बोलवले होते. मद्याच्या नशेमध्ये त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यानंतर कृष्णाने काजलवर चाकूने वार करून तिचा खून केला. त्यानंतर खोलीला कुलूप लावून तो बाहेर निघून गेला.

दरम्यान बाहेर पडताच कृष्णाने एका मित्रांसोबत मद्य प्राशन केले. त्यावेळी त्याने मित्राला सांगितले की त्याने त्याच्या पत्नीचा खून केला आहे. मित्राला हे कळताच ते घाबरले. त्यांनी थेट भारती विद्यापीठ पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ लॉजवर धाव घेतली आणि मृतदेह रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आरोपी कृष्णा कदम याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली. त्यावेळी त्याने त्याने लॉजवर नेऊन काजलचा खून केल्याचे सांगितले. आरोपीने खून कशासाठी केला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने लॉजवर जाऊन चाकूने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. आरोपीने खून कशासाठी केला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, कौटुंबिक वादातून आरोपीने ही हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे.

Protected Content