वाराणसी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । नोकरी न मिळाल्याने प्रेमाचा करून अंत झाला आहे. एका जोडप्याने लग्नानंतर २ वर्षातच टोकाचे पाऊल उचलत आपले आयुष्य संपवले. पतीने एमबीएची डिग्री घेऊन देखील त्याला नोकरी मिळत नसल्याने त्याने गळफास घेत आत्महत्या केली. तर या घटनेची माहिती माहेरी असलेल्या पत्नीला मिळताच तिने देखील बिल्डिंगवरुन उडी मारून तिचे आयुष्य संपवले. पतीने वाराणसीच्या सारनाथ येथील एका होमस्टे गेस्ट हाऊसमध्ये तर पत्नीने माहेरी गोरखपूरमध्ये जीवन संपवले. दोघांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
एमबीए सारखी व्यावसायिक पदवी मिळवूनही नोकरी न मिळाल्याने आणि बेरोजगारीमुळे नैराश्य आलेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा तरुण बिहारची राजधानी पाटणा येथील रहिवासी आहे. त्याने बनारस येथे एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तर त्याच्या पत्नीने गोरखपूर येथे घरवरून उडी मारून आत्महत्या केली. या तरुणाचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. दोघेही काही काळ सासरी राहिले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवागारात ठेवला आहे. फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
हरिष बागेश, संचिता श्रीवास्तव असे आत्महत्या केलेल्या पती पत्नीचे नाव आहे. या बाबत उपनिरीक्षक संदीप शर्मा यांनी सांगितले की, हरीश बागेश हा पटना येथील बारहचा रहिवासी असून त्याने दोन वर्षांपूर्वी गोरखपूरच्या संचिता श्रीवास्तवसोबत प्रेमविवाह केला. त्याने एमबीएचे शिक्षण घेतल्यानंतर तो मुंबईतील एका खासगी बँकेत नोकरी करत होता. पत्नी संचिता हीची प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याने ती नोकरी सोडून परत गोरखपूर येथे सासरे राम शरण श्रीवास्तव यांच्या घरी तो पत्नीसोबत राहू लागला. दरम्यान, काही करणास्थाव त्याने सासरच्या मंडळींना त्याच्या मूळ गावी बारह येथे जात असल्याचे सांगितले, मात्र, तो बारह येथे न जाता पाटण्याला बनारस येथे गेला. या ठिकाणी त्याने सारनाथजवळील अटलान नगर कॉलनी मवैया येथे ऑनलाइन होम स्टेमध्ये रूम बुक केली. व शुक्रवारी रात्री आठ वाजता त्याने हॉटेलमध्ये चेक इन केले. होम स्टेमध्येच ऑनलाइन जेवण ऑर्डर देखील केले. यानंतर त्याच्या पत्नीच्या मोबाईलवर जेवण ऑर्डर केल्याचा मेसेज गेल्यावर घरच्यांना तो बनारसमध्ये असल्याचे कळले. दरम्यान, त्याने या गेस्ट हाऊसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, घरचे त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. हॉटेलच्या वेटरने देखील जेवन रूममध्ये देण्यासाठी गेला असता हरिषने दरवाजा उघडला नाही. वेटरने खिडीकीतून पाहिले असता, हरिषने गळफास घेतला असल्याचे दिसले. कुटुंबीयांना काही समजण्यापूर्वीच पतीच्या आत्महत्येची माहिती मिळताच पत्नीनेही गोरखपूरमध्ये छतावरून उडी मारून आत्महत्या केली.
गोरखपूरमधील वरिष्ठ मानसिक आरोग्य डॉक्टर आणि तरुणाचे सासरे राम शरण श्रीवास्तव यांनी सांगितले की, नोकरी गेल्यानंतर हरिष बेरोजगारीमुळे निराश झाला होता. तो व्यसली देखील झाला होता. बेरोजगारी आणि नैराश्यातून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याचे सांगितले. पोलिसांनी खोलीतून नशा (गांजा), सिगारेट, लायटर, मोबाईल आणि पर्स आणि गळफास घेण्यासाठी वापरलेली दोरी जप्त केली आहे.