यावल (प्रतिनिधी)तालुक्यातील महेलखेडी गावातील जिल्हा परिषदच्या एका कर्तव्यनिष्ठ आदर्श शिक्षकाची झालेली अन्यायकारक बदलीच्या विरोधात शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समिती समोर आजपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. यावेळी प्रांतअधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांना निवेदनही देण्यात आले.
या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील महेलखेडी येथील जिल्हा परिषदच्या शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व असंख्य ग्रामस्थांच्या माध्यमातून आज दिनांक १५ जुलै रोजी यावल येथे तहसील कार्यालयात फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांना महेलखेडी जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील, कर्तव्यनिष्ठ, आदर्श शाळा निर्माण करणारे आदीवासी समाजातील शिक्षक हमीद फकीरा तडवी यांची करण्यात आलेल्या अन्यायकारक बदली रद्द होण्यासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत.
ग्रामस्थांची मागणी आहे की, शिक्षणासारख्या पवित्र ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना मद्यपान करून दमदाटी व धमकी देऊन तसेच इतरांमार्फत मानसिक त्रास देणारे सरपंच विलास भागवत पाटील यांना पदावरून कमी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याचप्रमाणे आपल्या पदाचा दुरुपयोग करून जिल्हा परिषद प्रशासनाकडे खोट्या तक्रारी करून आपला राजकीय दबाव आणून आदीवासी शिक्षक हमीद तडवी यांची बदनामी करणे, समाजामध्ये जातीयवाद निर्माण करणे, अशी कृत्य करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य रवीन्द्र पाटील यांचे सदस्यत्व रद्द करावे.
शिक्षक हमीद फकीरा तडवी यांची झालेली अन्यायकारक बदली होवुन पुन्हा मुळ शाळेवर महेलखेडी येथील शाळेवर नियुक्ती मिळावी, या मागणीचे निवेदन महेलखेडी तालुका यावलच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अब्दुल देशमुख उपाध्यक्ष जरीना रज्जाक तडवी, अलीशान युनुस देशमुख, लतीफ नजीर तडवी, नर्गीस फिरोज पटेल, सचिन सिताराम येवले, मिनाक्षी कमलाकर अडकमोल , गनी अब्बास पटेल,यांच्यासह पालक रज्जाक कालु तडवी, फिरोज गफुर पटेल, युनुस रशीद देशमुख, गनी अब्बास पटेल, भिकन पटेल, हितेश आंनदा येवले, संतोष एकनाथ न्हावकर, विनोद एकनाथ व्हावकर, विश्वास श्रावण तायडे, सुनिल पितांबर तायडे, आशाबाई प्रभाकर अडकमोल, नजमा मुबारक तडवी, गौतम श्रावण बिऱ्हाडे, कमलाकर नथ्थु अडकमोल यांच्यासह आदी महेलखेडी ग्रामस्थांच्या या निवेदना स्वाक्षरी आहेत.
प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले, तहसीलदार जितेन्द्र कुंवर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव, जिल्हा परिषद अध्यक्ष जळगाव, यांना या संदर्भातील निवेदन देण्यात आली असुन, महेलखेडीच्या जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी गावातील ग्रामस्थ आणि पालकवर्गासह पंचायत समिती कार्यालयासमोर आपले आमरण उपोषण सुरु केले आहे. उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे की, उपोषणार्थींच्या दुदैवाने जिवास धोका निर्माण झाल्यास त्यास साकळी / दहीगाव गटाचे जिल्हा परिषद रवीन्द्र पाटील हेच जबाबदार असतील.