रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दारू पिल्यानंतर बिल मागितल्याचा रागातून दोन जणांनी हॉटेल व्यवस्थापकाला शिवीगाळ व मारहाण करून गल्ल्यातील ८०० रूपयांची रोकड लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर शहरातील हॉटेल सेंटर पॉईंट येथे २५ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता शहरात राहणारे शेख शाहरूख शेख हसनरा रा. रावेर आणि शेख फरीद शेख ईस्माईल रा. मदिना कॉलनी, रावेर हे दोघेजण दारू पिण्यासाठी बसले. दारू पिल्यानंतर बिल देण्याच्या कारणावरून हॉटेल व्यवस्थापक दिपक रमेश पाटील (वय-२९) रा. राजे शिवाजी महाराज चौक, रावेर यांना दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच हॉटेलच्या गल्ल्यातून ८०० रूपयांची रोकड काढून धमकी देत पसार झाले. हा प्रकार घडल्यानंतर दिपक पाटील यांनी रावेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. रावेर पोलीस ठाण्यात शेख शाहरूख शेख हसनरा रा. रावेर आणि शेख फरीद शेख ईस्माईल रा. मदिना कॉलनी, रावेर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि शितलकुमार नाईक करीत आहे.