किराणा शॉप दुकान फोडून ६५ हजारांचा ऐवज लांबविला

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शेरा चौकातील सुहान शॉप दुकान फोडून दुकानातून किरणा सामानासह रोकड असा एकुण ६५ हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी रविवारी ६ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कच्छी इब्राहिम अब्दुल सत्तार वय ५१ रा. शेरा चौक, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे घरासमोर सुहाना सुपर शॉप दुकान आहे, दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता नेहमीप्रमाणे त्यांनी दुकान बंद केले होत. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री दुकान फोडून दुकानातून ५ हजारांची रोकड आणि किराणा सामान असा एकुण ६५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता उघउकीला आला. त्यानंतर कच्छी इब्राहिम यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील हे करीत आहे.

Protected Content