Home Cities जामनेर पहूर येथील शेतात आढळला भला मोठा अजगर

पहूर येथील शेतात आढळला भला मोठा अजगर

0
28

WhatsApp Image 2019 12 10 at 3.40.22 PM

पहूर, ता.जामनेर, प्रतिनिधी | पहूर कसबे येथील शेतकरी फकीरा नथू घोंगडे यांच्या शेतात भला मोठा अजगर आढळल्याने नागरीक भयभीत झाले. त्या अजगरास सर्पमित्रच्या साह्याने पकडून जामनेर येथील राम वनात जंगलात सुखरूप सोडण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की पहूर कसबे येथील फकीरा नथू घोंगडे यांच्या देवळी गोगडी शिवारातील शेतात आज भला मोठा अजगर आढळून आला. शेतात अजगर निघाल्याने शेतकरी भयभीत झाले. या अजगरास पाळधी येथील सर्पमित्र नानाभाऊ माळी यांनी पकडले. हा अजगर वन विभागाचे अधिकारी संदीप पाटील यांच्या सहकार्याने सर्पमित्र माळी यांनी जामनेर येथील राम वनातील जंगलात सुखरूप सोडून दिले. पहूर शिवारात पहिल्यांदाच भलामोठा अजगर दिसल्याने गावकऱ्यांनी पाहण्यासाठी एकच मोठी गर्दी केली होती.


Protected Content

Play sound