धरणगाव (प्रतिनिधी ) मतदारांमध्ये मतदान करण्याबाबत उत्साह पहावयास मिळाला. मतदान करण्यार तरुणाईमध्ये जो जोश होता तोच उत्साह गारखेडा येथील आजीबाईंनी दाखविला आहे.
गारखेडे येथीलवयाची शंभरी पर केलेल्यां आजीबाई अनुसयाबाई यांनी वयाच्या १०५ व्या वर्षी मतदान केंद्रात आपला हक्क बजावला आहे. त्या मतदान केंद्रावर त्याच्या नातेवाईकांन सोबत आल्या होत्या. कागदी मतपत्रिका ते इव्हिएम मशीन अशा प्रकारे मतदानाचे बदलत्या स्वरूपाच्या साक्षीदार असलेल्या अनुसयाबाई यांनी व्हीव्ही पट च्या सहाय्याने आपले मतदान कोणाला गेले याची खात्री केल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.