अमळनेर येथे शासकीय धान्य खरेदीस सुरुवात…

अमळनेर प्रतिनिधी । शासनाच्या भरडधान्याची खरेदी सुरू झाली असून, अमळनेर बाजार समिती आवारातील शासकीय गोदामात बुधवारी शासकीय धान्याची खरेदी सुरू झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील व बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील यांनी काटापूजन केले.

प्रथम विक्री करणारे शेतकरी भास्कर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. शेतमालास किमान आधारभूत हमीभाव मिळावा, यासाठी शासनाने हमीदर जाहीर करुन नाफेड तसेच पणन महासंघामार्फत प्रत्येक तालुकास्तरावर केंद्र उघडून शेतमालाची खरेदीसुरू झाली. ज्वारी खरेदीची शेतकऱ्यांसाठी हेक्टरी मर्यादा 8.21 क्विंटल वरून 16.5 क्विंटल पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त माल हमी भावात विकता येणार आहे. अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघात ज्वारी साठी 442, तर मक्यासाठी 235 व बाजरीसाठी फक्त 7 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ज्वारी साठी तालुक्याला 25 हजार 658 क्विंटल , मक्यासाठी 16 हजार 985 क्विंटल व बाजरीसाठी 1016 क्विंटल खरेदी उद्दिष्ट ठेवले आहे. मक्यासाठी हेक्टरी मर्यादा 19.39 क्विंटल आहे तर बाजरीची हेक्टरी मर्यादा 4.22 क्विंटल आहे.

यावेळी प्रमुख अतिथी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, बाजार समिती मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील, गुणवंत पाटील, संदीप पाटील, सुरेश पाटील, दीपक बागुल, भाईदास महाजन, वसंत पाटील, महेंद्र पाटील, काळू पाटील, प्रल्हाद पाटील, शेतकी संघ मुख्य प्रशासक संजय पाटील, महेश देशमुख, अलीम मुजावर, उमाकांत पाटील, संजय भिला पाटील, रावसाहेब पाटील, ज्ञानेश्वर पाटील, बी.के. सूर्यवंशी, सुधाकर धनगर, प्रा सुरेश पाटील, धनराज पवार, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी एन मगरे, सहकार अधिकारी सुनील महाजन, तहसीलदार मिलिंद वाघ, गोदाम व्यवस्थापक रवींद्र महाडिक, शेतकी संघ व्यवस्थापक संजय पाटील, आदी उपस्थित होते.

 

 

Protected Content