नवी दिल्ली, वृत्तसंस्था । काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी फेसबुक लाइव्ह चॅटमध्ये स्पोर्ट्स बेटिंग अर्थात सट्टेबाजीला अधिकृत मान्यता देण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे सरकार आणि क्रीडा क्षेत्र या दोघांना फायदा होऊ शकते असे त्यांनी म्हटले आहे.
यामुळे क्रिकेटमधील मॅच फिक्सिंग हा प्रकार कमी होण्यास मदत होईल असे त्यांचे म्हणणे आहे. सरकारने ही बाब अधिकृत केली तर त्यांना चांगले उत्पन्न मिळू शकेल. , असेही ते म्हणाले
सर्वोच्च न्यायालयाने याला फेअर प्ले असे घोषित केले आहे. त्यानंतर भारतात फॅटसी क्रिकेट मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भारतातील सर्वात मोठी फॅटसी कंपनी ड्रमी ११ ही आयपीएलच्या १३व्या हंगामाची स्पॉन्सर आहे. यावरून तुम्हाला लक्षात येईल की हा व्यवसाय किती वेगाने वाढत आहे. सरकार अशा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उत्पन्न मिळवत आहे. खेळ सट्टेबाजीला उत्पन्नाचे साधन बनवल्यास त्याच फायदा होईल.
भारतात क्रिकेट सट्टेबाजीला अधिकृत मान्यता द्यावी का या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, मी फक्त शिफारस केली होती. संसदेच्या गेल्या सत्रात मी एक खासगी विधेयक सादर केले होते. ज्यात सट्टेबाजीला अधिकृत करण्याच्या तरतूदी होत्या, असे थरूर म्हणाले.
सध्या यात अंडरवर्ल्डचा पैसा लागतो. याला कायदेशीर मान्यता दिली तर तुम्ही त्यांची सत्ता काढून घ्याल. सट्टेबाजीवर सध्या माफिया लोकांचे नियंत्रण आहे. तेच लोक पैसा लावतात. मॅच फिक्स करतात. सट्टेबाजी कायदेशीर केली तर त्यामुळे सरकारचे उत्पन्न वाढेल .
ते म्हणाले की, मला आश्चर्य वाटेत की सरकारने देशात सट्टेबाजी कायदेशीर केली नाही. याबाबत जनतेला शिक्षित करण्याची गरज आहे. सट्टेबाजीचा सध्या भयानक पद्धतीने वापर केला जातो. यातून अनियंत्रित पैसा कमवला जातो. स्पॉट फिक्सिंगची प्रकरणे होतात.