महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ धुमस्टाईल लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एसएमआयटी कॉलेज समोरील रोडवरून पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ चोरून नेल्याची घटना सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता समोर आले आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नुतन स्वप्निल पाटील वय ३४ रा. एसएमआयटी कॉलेज, जळगाव या महिला आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता महिला ही शहरातील एसएमआयटी कॉलेजसमोरून पायी जात होत्या. त्यावेळी अनोळखी व्यक्ती हा दुचाकीवरून आला व महिलेच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ जबरी हिसकावून चोरून नेली. ही घटना घडल्यानंतर महिलेने आरडाओरड केली तोपर्यंत संशयित आरोपी पसार झाला. त्यांनी दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास चऱ्हाटे हे करीत आहे.

Protected Content